वुमन इन द ड्यून्स - खेळ मांडीयेला वाळवंटी खाई
तेशिहागारा, अॅबे हे लोक युद्धोत्तर जपानमधेच वाढलेले, पण युद्धाचे जे खोलवर परिणाम संपूर्ण जपानवर झाले, त्यातून हे तेही सुटले नाहीत. स्वतःचा शोध घेणं, अस्तित्वाचा शोध घेणं, हे या युद्धामुळे अनेकांच्या मनात सुरू झालं. त्यात हे कलाकारही होते. आणि मग या अस्तित्व शोधातून होत जाणारी तगमग, स्वतःशीच होणारं वैचारिक युद्ध, हे सारं त्यांच्या कलाकृतीत उतरलेलं दिसतं. ‘Woman in the dunes’ ही त्यापैकीच एक आहे.......